Vegetable Rates : मोठी बातमी! टोमॅटो, गवार, लसूणच्या दरांमध्ये 20 टक्क्यांची वाढ

Vegetable Rates : सध्या भाजीपाल्याचे दर गगनाला भिडलेले आहेत. फक्त टोमॅटोच नाही तर इतर भाज्यांचे देखील दर गगनाला भिडले आहेत. यामुळे सर्वसामान्य लोकांचे आर्थिक बजेट चांगलेच कोलमडले आहे. बाजारामध्ये भाजीपाल्याची आवक कमी असली तरी मागणी चांगली आहे. भाजीपाला बाजारामध्ये गेल्या आठवड्या इतकीच रविवारी फळभाज्यांची आवक झाली. गवार, टोमॅटो, भेंडी, लसूण, कोबी, फ्लावर, दोडका, वांगी इत्यादींच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत दहा ते वीस टक्क्यांनी जवळपास वाढ झालेली दिसून आली आहे.

पालेभाज्यांचे दर वाढल्याने सर्वसामान्य लोकांचे आर्थिक बजेट चांगलेच कोलमडले असले तरी शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. बरेच शेतकरीचांगला नफा कमवत आहेत. भाजीपाल्यांवर लाखो ते करोडो रुपये शेतकऱ्यांनी कमावल्याच्या बातम्या देखील मागच्या काही दिवसापासून समोर येत आहेत त्यामुळे जरी सर्वसामान्य व्यक्ती नाराज असला तरी शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आ. हे त्याचबरोबर हे दर असेच कायम टिकून राहावेत असे देखील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे तर अजून किती दिवस असे महाग दर राहतील असे सर्वसामान्य लोकांचे म्हणणे आहे

दरम्यान रविवारी मार्केट यार्ड आतील घाऊक बाजारामध्ये पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली. परिणामी मेथी कोथिंबीर आणि इतर पालेभाज्यांचे भाव घातले हे भाव जवळपास 20 ते 30 टक्क्यांनी घटले असल्याचे माहिती मिळत आहे. कोथिंबीरीची जवळपास एक लाख 75 हजार तर मेथीचे 80 हजार जोडी आवक झाल्याची माहिती त्या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी दिली आहे.

शेतमाल : मेथी

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/07/2023
मुंबईक्विंटल10660001400010000

शेतमाल : भेडी

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
26/07/2023
मुरबाडहायब्रीडक्विंटल39400050004500
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल6300035003250