Tomato Rate : मागच्या काही दिवसापासून टोमॅटो हा चर्चेचा विषय ठरत आहेत. टोमॅटोच्या किमती पाहता रोजच टोमॅटोची चर्चा होत आहेत. टोमॅटोच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य लोकांचे आर्थिक बजेट चांगलेच कोलमडले आहे. टोमॅटो खरेदी करताना दहा वेळा विचार करून सर्वसामान्य लोकांना टोमॅटो खरेदी करावा लागत आहे. काही लोकांच्या भाजी मधून तर टोमॅटो गायब झाला आहे. मात्र असं असलं तरी शेतकऱ्यांनी चांगले लाखोकरोडो रुपयांचे उत्पन्न टोमॅटो मधून घेतले आहे. दरम्यान बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटमध्ये टोमॅटो दरात घसरण झाली आहे.
सर्वसामान्यांना मोठा दिलासा
शनिवारी प्रति ट्रे (२२किलो) 800 ते 100 200 रुपयात झाला आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहेत. आता कुठे शेतकऱ्यांच्या टोमॅटोला चांगले भाव मिळून शेतकरी आर्थिक दृष्ट्या मजबूत बनत होता. तोच टोमॅटोचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.
गत आठवड्यापासून टोमॅटोच्या दरामध्ये मोठी घसरण होत आहे. टोमॅटोचा प्रती ट्रे 1800 ते 2000 रुपये होता. मात्र होलसेल बाजारामध्ये दर कमी झाल्यामुळे किरकोळ बाजारामध्ये देखील दर कमी झालेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मागच्या सारखे दिवस पुढे येतील का असा शेतकऱ्यांना मोठा प्रश्न पडला आहे. मागच्यावेळी शेतकऱ्यांनी अक्षरशः टोमॅटो फेकून दिले होते. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आता संभ्रम निर्माण होत चालला आहे.
बेळगावमध्ये यावर्षी टोमॅटो ने 170 रुपये प्रति किलो दारापर्यंत मजल मारली होती. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट चांगलेच कोलमले होते. मात्र आता हा दर कमी झाला आहे. बेळगाव मधील मार्केटमध्ये तालुक्याच्या पश्चिम पूर्व भागासह महाराष्ट्रमधील कराड, सातारा, कोल्हापूर, पुणे याठिकाणी भाजीपाला येतो त्याचप्रमाणे गोवा व अन्य भागात बेळगावतून भाजीपाला निर्यात होतो.
शेतकऱ्यांचे हाल
टोमॅटोचे वाढते दर पाहता केंद्राने देखील ठोस पावले उचलले आहेत. केंद्र सरकारने नेपाळमधून टोमॅटो आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे टोमॅटोच्या किमती कमी होणार आहेत स्वतः केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे आता आगामी काळात टोमॅटोचे दर कमी होणार असल्याचे चित्र दिसत आहे.