Tomato Rate : सर्वसामान्यांना मोठा झटका! टोमॅटोचे दर वाढल्यामुळे शाकाहारी थाळी महागली

Tomato Rate : टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे शेतकरी चांगलेच मालामाल झाले आहेत. मात्र शेतकरी चांगले मालामाल झाले असले तरी सर्वसामान्य लोकांचे बजेट चांगलेच कोलमडले आहे. सध्या टोमॅटो खरेदी करत असताना गृहिणी दोन-चार वेळा विचार करताना दिसत आहेत/ बऱ्याच स्वयंपाकघरातून टोमॅटो तर गायबच झाला आहे/ आता टोमॅटोच्या वाढत्या दराचा परिणाम हॉटेल व्यवसायिकावरही झाला आहे/

शाकाहारी थाळी महागली

टोमॅटोचे दर वाढल्यामुळे हॉटेलमधील शाकाहारी थाळीच्या किमतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जून महिन्याच्या तुलनेमध्ये शाकाहारी च्या किमतीत जवळपास 88 टक्के वाढ झाल्याची माहिती समोर आली आह. रेटिंग एजन्सी क्रिसिलच्या ‘रोटी-तांदूळ दर’ अहवालात ही माहिती समोर आली आहे.

अहवालानुसार मागच्या काही दिवसापासून टोमॅटोचे दर चांगलेच वाढत आहेत. याचा परिणाम थेट शाकाहारी थाळीवर झाला असून मांसाहारी थाळीवर तुलनेने कमी परिणाम झाला आहे. यामुळे शाकाहारी थाळीची किंमत 28 टक्क्यांनी वाढली आहे तर मांसाहारी थाळीची किंमत फक्त ११ टक्क्यांनी वाढली आहे. सलग तिसऱ्या महिन्यात शाकाहारी थाळीची किंमत वाढल्याचे निदर्शनास आल्याचं रेटिंग एजन्सी क्रिसिलच्या अहवालात म्हंटल आहे.

टोमॅटोच्या भावाबद्दल पाहिले तर टोमॅटोचे भाव जुलै महिन्यामध्ये 233 टक्क्यांनी वाढवून 110 रुपये प्रति किलो वर पोहोचले जे जून मध्ये फक्त 33 रुपये प्रति किलो होते. देशाचा जर विचार केला तर देशांमधील प्रत्येक शहरांमध्ये टोमॅटोचे दर वेगवेगळे आहेत. राष्ट्रीय राजधानीत टोमॅटो दर्जा नुसार 180 ते 220 रुपये किलोने विकला जात आहे . तर मुंबई टोमॅटोचा दर 120 ते 150 रुपये किलो आहे.