Onion Rate | कांद्याचा वापर हा घराघरात केला जातो. दररोज स्वयंपाक घरात जेवण बनवताना कांदा हा लागतोच. त्यामुळे घरात एखादी एखादी भाजी नसली तरी चालते परंतु कांदा हा लागतोच. परंतु कांद्याच्या बाजारात नेहमीच चढ-उतार होताना दिसत आहे. आज देखील आपण कांद्याचा भाव अनेक शहरांमध्ये कसा प्रकारे आहे. तो कशा क्विंटलने विकला जात आहे. याची सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे आता तुम्ही तुमच्या शहरांमध्ये कांदा कसा आहे हे देखील पाहू शकता.
आपण कोल्हापूरमध्ये पाहिले तर कांद्याची आवाक 4646 क्विंटल एवढी आहे. कोल्हापूरमध्ये कांद्याचे कमीत कमी दर दीड हजार रुपये आहे, तर जास्तीत जास्त दर हे पाच हजार रुपये आहे. त्याचप्रमाणे आपण अकोल्यामध्ये पाहिल्या गेले तर कांद्याची आवक ही 770 क्विंटल एवढी आहे. अकोल्यामध्ये कांद्याचे कमीत कमी दर अडीच हजार रुपये आहे तर जास्तीत जास्त चार हजार रुपये आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये कांद्याची आवकी 485 क्विंटल एवढी आहे. कांद्याचे कमीत कमी दर तीन हजार रुपये आणि जास्तीत जास्त जर चार हजार दोनशे रुपये एवढे आहे. आपण मुंबईतील कांद्याचे मार्केट पाहिले गेले तर कांद्याची आवक ही 11473 क्विंटल एवढी आहे. त्याचे कमीत कमी दर तीन हजार रुपयांनी जास्तीत जास्त जर चार हजार पाचशे रुपये एवढे आहे.
सातारामध्ये कांद्याची आवक 117 क्विंटल एवढी आहे. साताऱ्यामध्ये कांद्याचे कमीत कमी दर दोन हजार रुपयांनी जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये एवढे आहे. त्याचप्रमाणे बारामतीमध्ये लाल कांद्याचे आवाज 334 क्विंटल एवढी आहे. त्यांचे कमीत कमी दर दीड हजार रुपयांनी जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये एवढी आहे.
त्याचप्रमाणे नागपूरमध्ये लाल कांद्याचे आवक 1000 क्विंटल एवढी आहे. नागपूरमध्ये कांद्याचे कमीत कमी दर तीन हजारांनी जास्तीत जास्त दर चार हजार एवढी आहे. पुण्यामध्ये लोकल कांद्याची 8109 क्विंटल एवढी आहे. पुण्यामध्ये कांद्याची कमीत कमी तर अडीच हजार रुपये आणि जास्तीत जास्त जर 4600 एवढे आहे.