Agriculture News : कांद्यानंतर आता कोथिंबीर उत्पादक शेतकरी चिंतेत; दराभावी शेतकऱ्यांनी कोथिंबीर फेकली रस्त्यावर

Agriculture News : शेतकरी शेतात रात्रंदिवस कष्ट करून आपले पीक फुलवत असतात. मात्र जर या पिकाला योग्य भाव मिळाला नाही तर शेतकऱ्यांचा खर्च झालेला सुद्धा निघत नाही. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट येते. मागच्या काही दिवसापासून कांद्याचे भाव खूप कमी आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा जाळून टाकल्याचा तसेचकांद्यामध्ये रोटावेटर फिरवल्याचे अनेक प्रकार घडले होते. आता कोथिंबीरच्या बाबतीत देखील असे प्रकार घडू लागले आहेत. एका शेतकऱ्याने कोथिंबीर रस्त्यावर फेकून दिल्याचा प्रकार घडला आहे.

कुठे घडला हा प्रकार

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकऱ्यांनी कोथिंबीर रस्त्यावर फेकून दिल्याची घटना घडली आहे. बीड मधील काही शेतकऱ्यांनी सोलापूर बाजार समितीमध्ये कोथिंबीर विक्रीसाठी आणली होती. मात्र योग्य तो भाव मिळाला नाही त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी कोथिंबीर अक्षरशः रस्त्यावर फेकून दिली आहे.

खर्चही निघत नाही

या शेतकऱ्यांना बीड वरून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी कोथिंबीर आणण्यासाठी एका कॅरेटला पन्नास रुपये खर्च आला होता. पण कोथिंबिरीच्या एका कॅरेटला दहा रुपये दर मिळाला त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी कोथिंबीर फेकून दिली आहे. कोथिंबीर शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकून देताच तेथील काही नागरिकांनी ही कोथिंबीर घाऊक बाजारात विकण्यासाठी नेली. त्याचबरोबर काही लोकांनी जनावरांना खाण्यासाठी नेली आहे.

सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह?

दरम्यान, आता पुन्हा एकदा सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. सरकारने शेतमाल बाजारभावा बाबत योग्य उपाययोजना कराव्यात त्याचबरोबर पिकाला हमीभाव द्यावी अशी मागणी युवा शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे