Tomato Rate : मागच्या काही दिवसापासून टोमॅटोच्या दराने सर्वसामान्य लोकांचे आर्थिक बजेट चांगलेच कोलमडले आहे. त्यामुळे टोमॅटोचे दर कमी करण्यासाठी सरकारने अनेक प्रयत्न देखील केले आहेत. असे असले तरी शेतकऱ्यांना मात्र याचा फायदा होत होता. अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो विकून लाखो ते करोडो रुपये कमावले आहेत. मात्र सध्या आता शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. तर सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारी दिलासा मिळाला आहे. सरकारने पन्नास रुपये किलोने टोमॅटो विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सरकारने केंद्राच्या ग्राहक व्यवहार विभागाने एनसीसीएफ (NCCF) आणि नाफेडला (NAFED) टोमॅटो ५० रुपये किलोने विकण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. दिल्लीमधील एनसीआरमध्ये ५० रुपये किलोने टोमॅटोची विक्री (दि.१४) पासून सुरु करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर दिल्ली एनसीआर व्यतिरिक्त राजस्थानमधील जोधपूर कोटा, उत्तर प्रदेशामधील लखनऊ, वाराणसी, कानपूर, प्रयागराज आणि बिहारमधील मुझफ्फरपूर, पटना, आराह, बक्सरमध्ये टोमॅटो स्वस्त दरात विकले गेले आहेत. यामुळे सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Tomato Rate )
शेतकऱ्यांना मोठा धक्का
मागच्या काही दिवसापासून शेतकऱ्यांनी टोमॅटो विकून चांगले पैसे कमावले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती देखील चांगली झाली होती. मात्र आता सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचे अजूनही शेतात टोमॅटो आहेत मात्र दर कमी झाल्यामुळे टोमॅटो विकणे परवडणार नाही असे देखील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा
टोमॅटोचे वाढते दर पाहता शहरी भागातील लोकांचे आर्थिक बजेट चांगलेच कोलमडले होते. गृहिणींना टोमॅटो खरेदी करताना दहा ते बारा वेळा विचार करावा लागत होता. मात्र काही लोकांच्या भाजीतून तर टोमॅटो गायबच झाले होते. मात्र सध्या केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्य लोकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
या ठिकाणी पहा टोमॅटोचे बाजार भाव
शेतकरी मित्रांनो टोमॅटोला बाजारामध्ये किती भाव मिळतोय हे जर तुम्हाला पाहायचे असेल तर गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi हे मोबाईल ॲप इंस्टॉल करा. हे मोबाईल ॲप इंस्टॉल केल्यानंतर यामध्ये तुम्ही रोजचे बाजारभाव, हवामान अंदाज, जमीन मोजणी, सातबारा उतारा, पशूंची खरेदी-विक्री त्याचबरोबर इतर कृषिविषयक सर्व माहिती मिळवू शकता. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असेल तर लगेचच गुगल प्ले स्टोअरला जा आणि आपले हॅलो कृषी हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा.