Ginger Rate | आल्याच्या हायब्रीड जातील प्रति क्विंटल आहे ‘एवढा’ भाव, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Ginger Rate | आलं हे आपल्याला स्वयंपाक करताना खूप महत्त्वाचे असतं. जवळपास सगळ्याच भाज्यांमध्ये घरातील गृहिणी आल्याचा वापर करत असतात. त्याचप्रमाणे चहात देखील मोठ्या प्रमाणात आल्याचा वापर केले जातात. तसेच आलं हे एक आयुर्वेदिक आहे. आल्यामुळे आपल्या अनेक आजार बरे होतात. अगदी खोकला, सर्दी, डोकेदुखी यासारख्या आजारांना आलं चांगल्या प्रकारे मात देते.

आता आपण आजच्या दिवशी आल्याचा बाजार भाव कशाप्रकारे आहे कोणत्या क्षेत्रात किती भाव आहे या सगळ्याची माहिती पाहणार आहोत.

हेही वाचा- Garlic Price | आशियातील सर्वात मोठ्या भामाशाह बाजारपेठेत लसणाच्या दरात मोठी वाढ, पाहा आताचे भाव

आज म्हणजे 4 डिसेंबर 2023 रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्याची आवक 34 क्विंटल एवढी आहे. आल्याचे कमीत कमी दर येथे साडेतीन हजार आहे. आणि जास्तीत जास्त जर नऊ हजार एवढे आहेत.

कल्याण येथे हायब्रीड जातीला तीन क्विंटल एवढी आवाक आहे. कल्याण येथे आल्याचा कमीत कमी दर 9000 आणि जास्तीत जास्त दर 9600 रुपये एवढे आहे.

आपण पुण्यात जर पाहिले तर लोकल जातीला 544 क्विंटल एवढी आवक आहे. याचे कमीत कमी दर तीन हजार रुपये आहे. तर जास्तीत जास्त जर सात हजार रुपये एवढे आहे. आपण जर कराडमध्ये पाहिले तर कराड येथील आल्याच्या लोकल जातीला 24 क्विंटल एवढी आवक आहे. कराडमध्ये आल्याचे कमीत कमी दर 7000 रुपयांनी जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे रुपये एवढे आहे.