Cotton Rate | मित्रांनो यावर्षी म्हणजे 2023 रोजी अत्यंत कमी पाऊस पडला आहे. जून ते सप्टेंबर महिन्यात केवळ 88 टक्के पाऊस पडला आहे. म्हणजेच दरवर्षीच्या तुलनेने यावर्षी पाऊस जवळपास १२ टक्के कमी नोंद करण्यात आलेला आहे. यामुळे राज्यातील जवळपास 40 तालुक्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे.
दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेले अनेक तालुके हे कापूस उत्पादनासाठी ओळखले जातात. यावर्षी पाऊस कमी पडल्याने जवळपास 30 ते 35 टक्क्यांनी कापूस उत्पादन यावर्षी कमी होणार आहे. असा अंदाज लावला जात आहे. त्यामुळे जेवढा काही कापूस होईल त्याला चांगला उत्पादन मिळावे अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती.
हेही वाचा- Soyabean Market | आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव का वाढला? जाणून घ्या कारणे
त्यामुळे आता यावर्षी म्हणजेच जानेवारी ते मार्च या कालावधीत कापसाला किती दर मिळू शकतो. याबाबत पुणे येथील कृषी विभागांतर्गत कार्यरत असलेल्या स्मार्ट प्रकल्पाच्या बाजार माहितीचे विश्लेषण व जोखीम व्यवस्थापक कक्षेने एक महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे.
त्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार जानेवारी ते मार्च 2024 या कालावधीत कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटल ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव मिळू शकतो. असे देखील त्यांनी सांगितले आहे.
यावर्षी कापसाचे भाव कसे असतील | Cotton Rate
2022 मध्ये या कापसाला जवळपास 9500 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी भाव होता. तर 2023 मध्ये हाच भाव आठ हजार रुपये प्रतिक्विंटल मिळाला होता. आता 2024 मध्ये सात हजार ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल एवढा भाव असावा, अशी शक्यता या संस्थेने वर्तवली आहे.