Banana Rate | आता केळी खाणे पडणार महागात, जाणून घ्या केळीचे तुमच्या शहरातील दर

Banana Rate | केळी हे फळ सगळ्यांच्याच आरोग्यासाठी अत्यंत चांगले आहे. लहान मुले असतील किंवा अगदीच आजारी लोक असतील तर त्यांच्यासाठी देखील केळीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतु आपण पाहिले तर काही शहरांमध्ये आता केळीची आवक कमी झालेली आहे. आणि केळीचे दर मात्र मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. आता तुम्ही तुमच्या शहरातील केळीचा भाव नक्की कशाप्रकारे आहे हे देखील पाहू शकता.

आपण नाशिक या शहरांमध्ये पाहिलं तर नाशिकमध्ये भुसावळी केळीची जातीची आवक 310 क्विंटल एवढी आहे. नाशिकमध्ये केळीचे कमीत कमी दर 500 रुपये एवढे आहेत. तर जास्तीत जास्त दर 1100 रुपये आहे. त्याचप्रमाणे सर्वसाधारण दर हे 700 रुपये एवढे आहे.

हेही वाचा – Ginger Rate | आल्याच्या हायब्रीड जातील प्रति क्विंटल आहे ‘एवढा’ भाव, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

नागपूरमध्ये आपण भुसावळ जातीची केळी पाहिली तर याची आवक केवळ 47 क्विंटल आहे. नागपूरमध्ये केळीचे कमीत कमी दर हे 450 रुपये तर जास्तीत जास्त दर 550 रुपये एवढे आहे.

पुण्यात मात्र लोकल केळीचे आवाज केवळ 12 क्विंटल एवढी आहे. परंतु याचे कमीत कमी दर 800 रुपयांनी जास्तीत जास्त दर 1600 रुपये एवढे आहे. त्याचप्रमाणे मोशीमध्ये पाहिले तर लोकल केळीची आवाक 20 क्विंटल एवढी आहे. मोशीमध्ये केळीचे कमीत कमी दर 2000 रुपयांनी जास्तीत जास्त दर 6000 रुपये आहेत. त्याचप्रमाणे सर्वसाधारण दर आपण पाहिले तर चार हजार रुपये एवढे आहे म्हणजेच पुणे आणि मोशी मध्ये केळीचे दर हे मोठ्या प्रमाणात महागलेले आहे.