Curry Leaves Rate | आजकाल सगळ्याच गृहिणी स्वयंपाकांमध्ये कढीपत्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. अगदी अनेक जण घरी देखील छोटे छोटे कढीपत्त्याची झाड लावत असतात. परंतु आपण बाजारामध्ये कढीपत्ता विकत घ्यायला गेलो, तर जास्त रुपयांना खूप कमी कढीपत्ता आपल्याला मिळतो तर आज आपण या कढीपत्त्याचे बाजार भाव काय आहे याची माहिती पाहूया.
आज 4 डिसेंबर 2023 रोजी कल्याण मध्ये कडीपत्त्याच्या हायब्रीड जातीला तीन नग एवढा भाव आहे कढीपत्त्याचे कल्याणमध्ये कमीत कमी दर अडीच हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर साडेतीन हजार रुपये मध्ये आहे.
आपण जर पुण्यात पाहिले तर कढीपत्त्याच्या लोकल जातीला 21 क्विंटल एवढी आवक आहे. याचे कमीत कमी दर दोन हजार रुपयांनी जास्तीत जास्त दर चार हजार रुपये आहे.
हेही वाचा – Garlic Price | आशियातील सर्वात मोठ्या भामाशाह बाजारपेठेत लसणाच्या दरात मोठी वाढ, पाहा आताचे भाव
आपण मोशीमध्ये पाहिले तर कढीपत्त्याच्या लोकल जातीला अकरा क्विंटल एवढी आवक आहे. त्याचप्रमाणे कढीपत्त्याचे कमीत कमी दर अडीच हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार रुपये एवढे आहे.