Agriculture News : मागच्या काही दिवसापासून कांद्याच्या कमी दरामुळे शेतकरी चांगले चिंतेत आहेत. कांदा सतत शेतकऱ्याला रडवत असल्याचे चित्र दिसत आहे. त्याचबरोबर आता कोथिंबिरीचे भाव घसरल्याने देखील शेतकरी हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागच्या काही दिवसापूर्वी कांद्याला भाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कांद्यामध्ये रोटावेटर फिरवले होते तर काहींनी अक्षरशः कांदा जाळून टाकला होता असे अनेक प्रकार घडले होते. सध्या देखील कोथिंबिरीच्या बाबतीत असाच एक प्रकार घडला आहे
कोथिंबिरीचे भाव घसरल्याने पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याने कोथिंबीर फेकून दिली आहे. राहुल थोरात असे या शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याने एका एकर मधील कोथिंबीर काढून टाकण्यासाठी वीस महिलांना रोजगार देऊन शेत मोकळे करून घेतले आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार कोथिंबीरचे दर घसरल्यामुळे लागवड केलेला खर्च सुद्धा मिळाला नाही यामुळे शेतकऱ्यांने हा टोकाचा निर्णय घेतला. (Agriculture News )
शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान
राज्यात अतिवृष्टी झाल्यामुळे त्यांचे उसाचे उत्पन्न घटले आणि परिणामी त्यांनी कोथिंबीरीची लागवड केली. त्यांना अपेक्षा होते की कोथिंबिरीला चांगला बाजार मिळेल मात्र त्यांना कोथिंबिरीला चांगला बाजार मिळत नसल्यामुळे त्यांना मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. व्यापारी आज ना उद्या कोथिंबीर नेण्यासाठी येईल मात्र व्यापाऱ्याची वाट पाहिली पण तो व्यापारी काय आलाच नाही. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्याने कोथिंबीर जागेवर शेतात काढून टाकली. (Coriander Rate)
कोथिंबीरीला सध्या किती भाव मिळतोय तुम्हाला माहिती आहे का? जर तुम्हाला माहिती नसेल तर लगेच प्ले स्टोअर वर जा आणि Hello krushi हे ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये तुम्ही कोथिंबिरीला किती बाजार भाव मिळतोय हे पाहू शकता. बाजार भावाबरोबरच कृषी योजना, पशुंची खरेदी विक्री, तसेच जुगाड खरेदी विक्री आणि अन्य कृषी विषयक माहिती तुम्ही या ॲपमध्ये मिळवू शकता तेही अगदी मोफत त्यामुळे लगेच प्ले स्टोरवर जा आणि हे अँप इंस्टाल करा.