Success Story : भेंडीच्या शेतीने बदलले शेतकऱ्याचे नशीब, 10 लाख रुपयांचा निव्वळ नफा

Success Story : मान्सून सुरू होताच देशातील महागाई झपाट्याने वाढत आहे. मागच्या काही दिवसापासून टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहे. याचबरोबर फक्त टोमॅटोचं नाही तर इतर पालेभाज्यांचे देखील भाव गगनाला भिडले आहेत. टोमॅटो, भेंडी, बाटली, काकडी, शिमला मिरची, कारले यासह जवळपास सर्वच हिरव्या भाज्या महागल्या आहेत. मात्र या महागाईत अनेक शेतकऱ्यांची लॉटरी लागली आहे. टोमॅटो आणि हिरव्या भाज्या विकून अनेक शेतकरी करोडपती झाले आहेत. सध्या देखील बिहारमधील एका शेतकऱ्याने भेंडी विकून लाखो रुपये कमावले आहेत.

शेतकऱ्याने कमावले लाखो रुपये

रामविलास शाह असं या शेतकऱ्याचं नाव आहे. या शेतकऱ्याने कमाईच्या बाबतीत सरकारी अधिकाऱ्यांनाही मागे टाकले आहे. रामविलास भेंडीच्या शेतीतून वर्षभरात लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. एका महिन्यात ते एक लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची भेंडी विकतात. व्यापारी शेतात येतात आणि त्यांच्याकडून भेंडी खरेदी करतात, अशी माहिती स्वतः शेतकऱ्याने दिली आहे. (Success Story )

रामविलास हे पूर्वी राजस्थानमध्ये मजूर म्हणून काम करायचे. मात्र ते नंतर गावाकडे आले आणि त्यांचे शेजारी भेंडीची लागवड करताना दिसले, ज्यातून त्याला चांगले उत्पन्न मिळत होते. रामविलास यांनी देखील शेती करण्याचा निश्चय केला. सुरुवातीला त्यांनी कमी भेंडीची लागवड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना त्यामधून चांगले उत्पन्न मिळाले. सध्या ते एक एकरामध्ये भेंडी पिकाची लागवड करत आहेत. एक एकरात भेंडी पिकवून अवघ्या 6 महिन्यांत 10 लाख रुपये कमावल्याचे त्यांनी सांगितले आहे.

याबाबत बोलताना शेतकरी रामविलास म्हणाले की, एका कट्ट्यात भेंडीची लागवड करण्यासाठी 3 हजार रुपये खर्च येतो. तर दरमहा 30 हजार रुपये कमावतात. अशा प्रकारे एक एकर शेती करून दर महिन्याला 5 ते 6 लाख रुपये कमावतात. संपूर्ण हंगामात भेंडीची विक्री करून 10 लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावल्याचे देखील त्यांनी सांगितले.

भेंडीचा बाजार भाव कुठे पाहणार?

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर भेंडी आणि इतर पालेभाज्यांचे बाजारभाव चेक करायचे असतील तर आत्ताच प्लेस्टोर वर जा आणि आपले Hello Krushi हे ॲप इंस्टाल करा. या ॲप मध्ये तुम्ही रोजचे ताजे बाजारभाव चेक करू शकता. बाजारभावा सोबतच तुम्ही हवामान अंदाज, सरकारी योजना, जमीन मोजणी, पशूंची खरेदी विक्री इत्यादींची माहिती देखील घेऊ शकता. ती ही अगदी मोफत त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेचच हे ॲप इन्स्टॉल करा.