Tomato Market : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मागील काही दिवसांपासून टोमॅटोच्या किमती गगनाला भिडल्याचे पाहायला मिळत आहे. एकेकाळी कवडीमोल भावात मिळणाऱ्या टोमॅटोच्या किमती आता 150 रुपयांच्यावर गेल्या आहे. किमती वाढल्याने अनेकजण टोमॅटो खरेदी करण्याचे टाळतात.
त्यामुळे सगळीकडे त्याची चर्चा सुरु आहे. यातच आता आणखी एक भर पडली आहे. एका मुलीने आपल्या आईसाठी परदेशातून 10 किलो टोमॅटो आणला आहे. दुबईत राहणाऱ्या मुलीला भारतात परत येताना तिच्या आईने 10 किलो टोमॅटो आणायला सांगितले. ती देखील आपल्या आईसाठी 10 किलो टोमॅटो घेऊन आली. याची माहिती तिच्या भावाने एक ट्विट करत दिली आहे.
आता हे ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे. या ट्विटला आतापर्यंत 54,000 पेक्षा जास्त वेळा पाहिले असून 700 पेक्षा जास्त लाईक्स मिळाल्या आहेत. दरम्यान, आता दिवसेंदिवस वाढत चाललेल्या किमतीमुळे केंद्राने टोमॅटो बाजारात हस्तक्षेप केली आहे. याचा परिणाम झाला टोमॅटोच्या किमतीवर झाला आहे, त्यामुळे किमतीत नरमाई पाहायला मिळत आहे.